प्रभादेवी :- गरजूना मदत, रुग्णांना साहित्य वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून स्वराराज प्रतिष्ठानने केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे असे गौरवोदगार विश्वनाथ डामरे यांनी काढले.
प्रभादेवी येथील उमेश गावडे यांच्या दुकानाच्या उदघाटन प्रसंगी विश्वनाथ बोलत होते.
स्वरराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष उमेश गावडे यांनी वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवून परिसरातील नागरिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
रुग्णांना व्हील चेअर तसेच मेडिकल साहित्य, शैक्षणिक साहित्य वाटप, तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा यामुळे तरुणांना प्रोत्साहन मिळाले असेही त्यांनी सांगितले.
तरुणांना रोजगार मिळावा व्यवसाय करता यावा या उद्देशाने प्रभादेवी येथे दुकान सुरु करण्यात आले असून या माध्यमातून अनेकांना रोजगार देता येऊ शकेल ही यामागची संकल्पना असल्याचे उमेश गावडे यांनी सांगितले.
