हनुमंतरायांच्या मधुर गाण्याने श्रोते मंत्र मुग्ध झाले.

Share

रजनीकांत सुहास साळवी

प्रभादेवी, ता. 29 :- जय हनुमान सेवा मंडळ वारेली, मुंबईच्या वतीने शतक महोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेले हे रामदुता अंजनी सुता हे श्रवणीय आणि मधुर गाण्याने उपस्थित श्रोते मंत्र मुग्ध झाले.

जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने शतक महोत्सवाचे औचित्य साधत खास गाणे तयार करण्यात आले होते याचे अनावरण माटुंगा येथील दादर माटुंगा कल्चर सेंटर येथे करण्यात आले.

चित्रपट निर्मात्या पायल कदम आणि शुभम प्रोडक्शनचे गणेश कदम यांच्या हस्ते या ध्वनीफितीचे अनावरण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र बाजार पेठेचे संस्थापक कौतिक दांडगे, उद्योजक सुभाष सारंग, नंदकिशोर तळाशीलकर, सुरेंद्र गावडे, वसंत कदम, रवींद्र भेरे, राजेंद्र टाकले आदी उपस्थित होते.

संकट मोचन मारुती रायावर आधारलेल्या या गाण्याचे निर्माते जय हनुमान सेवा मंडळ, गीतकार राजेंद्र टाकले, संगीतकार प्रशांत कदम, ध्वनी मुद्रक अविनाश बाईत, गायक रवींद्र बेहरे व सह गायक अमित शिंदे आणि विशाल कदम यांनी गायले आहे.

यावेळी महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले यात सोन्याची नथ, पैठणी साडी, चांदीची फ्रेम व लकी ड्रॉ अशी बक्षिसे महिलांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *