कोळी समाजाला हवाय त्यांचा हक्क

Share

कोळी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेऊ नये

नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनची मागणी

मुंबई ता. 18 :- मुंबईचा आद्य नागरिक म्हणून कोळी समाजाकडे पाहिले जाते अशात च समुद्रकिनारी उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी समाजाच्या बोटीना हटविण्यात येत आहे त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहवर गदा येत असून त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेऊ नये अशी मागणी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनणे केली आहे.

गिरगांव चौपाटीवर मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाच्या बोटी हटविण्यात आले त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर गदा आली मासेमारीवरच आपला उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे सरकारने हे त्वरित थांबवून त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेऊ नये अशी मागणी नॅफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

प्रत्येक भागात कोळी समाजाने आपली पारंपरिक संस्कृती आणि व्यवसाय जतन केले आहे मात्र प्रशासनाच्या या कारवाईमुळे कोळी समाज पूर्णतः हतबल होत चालला आहे.

गिरगांव नंतर आता वरळी, वर्सोवा, दांडा वाढवण याठिकाणाहून देखील कोळी बांधवाना हद्दपार केले तर आम्ही जायचे कुठे असा प्रश्न भानजी यांनी उपस्थित केला.

किनारपट्टीवरून हुसकावून लावण्याआधी कोळी समाजाला विचारात घेणे आवश्यक आहे त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे एखाद्या वेळेस स्थलांतरित केल्यानंतर त्यांचे योग्य पुनर्वसन केले पाहिजे तसेच त्यांच्या बोटी लावण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे अशी मागणी नॅफच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *