प्रभादेवी : प्रभादेवी येथे होणाऱ्या यंग प्रभादेवी क्रीडा मंडळ क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावाची प्रक्रिया रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.यात पुरुष आणि महिला संघांच्या मालकांनी अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावत संघबांधणीवर भर दिला.
यंग प्रभादेवी क्रीडा मंडळ प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद
यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाच्या वतीने महिलांना त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत त्यांना विरंगुळा मिळावा त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक स्वरूप घाग, रोनित जाधव आणि सन्मेष गावडे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून कल्पेश कोरगावकर अमेय जावळकर, धवल देसाई, कल्पेश कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचे मंडळाचे सचिव राजेश घाग यांनी सांगितले.
यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाच्या 75 वर्षाच्या वाटचाली निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असून क्रिकेट स्पर्धा हा त्यातीलच एक भाग आहे याआधीही गीत गायनाची स्पर्धा घेण्यात आली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सचिव राजेश घाग यांनी सांगितले.
