समृद्ध कोकण – वारेली पुस्तकाचे प्रकाशन

Share

रजनीकांत साळवी

प्रभादेवी, ता. चिपळूण तालुक्यातील वारेली या खेडेगावातील संकट मोचन मारुती मंदिराच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईतील जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने कोकणातील पर्यटन स्थळाची माहिती असलेले समृद्ध कोकण – वारेली या पुस्तकाचे प्रकाशन केले.

जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा व वारेली मधील संकट मोचन मारुती मंदिराच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी गावातील स्थानिक मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.

यावेळी धोंडू कदम यांना जीवन गौरव पुरस्कार व पांडुरंग कदम यांना कला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी रामचंद्र कदम, भिकाजी कदम, प्रकाश कदम, तानाजी कदम, सुभाष कदम, रुपेश कदम, प्रदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती सर्वदूर पोहचावी यादृष्टीने कोकणात असलेल्या कोरीव लेण्या, प्रसिद्ध मंदिरे, पाण्याचे झरे आशा विविध विषयांचे लेख या पुस्तकातून मांडण्यात आले आहे.

तसेच उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे व शिव गीत पोवाडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे जय हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *