रजनीकांत सुहास साळवी
दादर :- शेकडो कलावंतांच्या कलात्मक उर्जेचा संगम घडवून आणणाऱ्या, नव वर्षाचे दणक्यात स्वागत करून मराठी संस्कृतीचे केंद्रस्थान म्हणून प्रचलित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात सुरू असलेल्या आर्ट फेस्टिवलला समस्त कलाप्रेमी आणि मुंबईकरांची भुरळ पडत आहे.
दादर शिवाजीपार्क येथे आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकलपेनेतून तसेच वेध या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव रविवार दिनांक 12 जानेवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत कलाप्रेमींसाठी खुले असणार आहे.
या कला महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे दर्यापती, दर्यापती शिवराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतीय नौदल क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान सांगणारे प्रदर्शन असून हे महोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
महाराजांच्या लढाऊ युद्धनौकांच्या प्रतिकृती, मराठ्यांचा समुद्र लढायांचा इतिहास, शिवकालीन नाणी, जगप्रसिद्ध असलेल्या जगदंबा तरवार बनलेल्या कंपनीतील जुन्या शिवकालीन तरवारी, सिंधुसागरात बांधलेले छत्रपती शिवरायांचे अभेध दुर्गाचे ड्रोण छायाचित्र या प्रदर्शनातून नागरिकांना पाहायला मिळत आहेत.
मुंबईचे दर्शन घडविणाऱ्या मुंबई अक्षरातून सकरण्यात आलेली कलाकृति, पतंगाची कलाकृती सुंदर अशा टोपल्यानची साकारलेल्या कलाकृती जवळ सेल्फी काढण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही
मुंबई फूड फेस्टच्या निमित्ताने प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध स्टॉल्सवर असलेल्या अस्सल खाद्य पदार्थांची मेजवानी घेण्यासाठी खवय्याची झुंबड उडाली आहे. तर सुबक सुंदर आणि अप्रतिम अशा कलात्मक वस्तूंचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले असून ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
बच्चे कंपनीसाठी समुद्र लगत किड्स कार्निवल ठेवण्यात आले असून गमती जमती, मजा मस्ती आणि आनंदाने भरलेली कालशिबिरे किड्स कार्निवल मध्ये बच्चे कंपनीला आकर्षित करीत आहेत.
