ख्रिसमससाठी माहीम आणि पोर्तुगीज चर्च मध्ये उत्साहाचे वातावरण
प्रभादेवी, ता. 25 :- ख्रिस्मस सण ख्रिस्ती बांधव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आकर्षक विद्युत रोषणाई, स्टार कंदील, आणि येशूच्या जन्मोत्सवाचा देखावा प्रत्येक ठिकाणी सकरण्यात येतो माहीम मध्ये सकरण्यात आलेला 30 फुटाहून अधिक उंच असा ख्रिसम्स ट्री आणि सांता स्टॉप पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली.
ख्रिसमस निमित्त शीतलादेवी येथील विकटोरीया चर्च मध्ये भव्य असा ख्रिसमास ट्री साकारला असून चर्च बाहेर सेल्फी पॉईंट साकारला आहे.
यात आकर्षक रोषणाईचा गेट सांता स्टॉप घोड्याचा रथ, मोठी बेल सकरण्यात आली असून खास करून बच्चे कंपनीला याचे आकर्षण वाटत असून फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही. त्यामुळे याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती
ख्रिसमस सनानिमित्त प्रसिद्ध असलेल्या माहीम आणि पोर्तुगीज चर्च मध्ये आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली असून ख्रिस्ती बांधव मोठ्या आस्थेने आदल्या दिवशी चर्च मध्ये जाऊन मास केला.
पोर्तुगीज चर्चला रंग काढून रोषणाई करण्यात आली होती तर चर्च मध्ये मोठ्या स्क्रीनवर लिहिलेला सुंदर सुविचार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
माहीम चर्च बाहेर ख्रिसमस साठी सजलेली फराळाच्या दुकानात केक, करंजी, चकली खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवानी गर्दी केली होती.
तर घरा घरात उत्साहाचे वातावरण होते. दादर येथे जॉन डांटस यांनी आपल्या घरातच भव्य असा ख्रिसमस ट्री साकारला होता. तसेच येशूच्या जन्माचा देखावा साकारला होता. घरातच नातेवाईक आणि मित्र मंडळी सोबत सेलिब्रेशन साजरा केल्याचे त्यांनी सांगितले.