बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Share

शासकीय इतमामात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना अखेरची मानवंदना

मुंबई :- बॉलीवूड मधील ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर मंगळवारी दादर शिवाजीपार्क स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीन फैऱ्या झाडत त्यांना पोलिसांनी सलामी दिली.

शिवाजीपार्क स्मशान भूमीत त्यांचे पार्थिव आणण्यापूर्वीच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी शिवाजीपार्क परिसरात गर्दी केली होती.

चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, उद्योजकांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजीपार्क स्मशान भूमीत हजेरी लावत श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ दिग्दर्शक जावेद अख्तर , नसीरउद्दीन शाह, बोमन इराणी, सचिन खेडेकर, श्रेयस तळपदे अशा अनेक कलाकारांनी त्यांना साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला.

श्याम बेनेगल यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते देह रूपाने या जगातून गेले असले तरी त्यांनी आपल्या कलाकृतीतून अनेक आठवणी मागे सोडल्या आहेत.

अंकुर चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित होता या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली.

चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान देऊन ज्यांच्यामुळे अनेक चित्रपट निर्माते तयार झाले चित्रपट सृष्टीत जागृती झाली चैतन्य निर्माण झाले अशा श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीचे फार मोठे नुकसान झाले आहे अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर सुप्रसिद्ध दिग्दर्शकांमधून सत्यजित आणि श्याम बेनेगल हे दोन हिंदुस्तानी दिग्दर्शकांची नावे होती त्यामुळे आताच्या नवोदित दिग्दर्शकांनी त्यांचे काम पुढे घेऊन जावे असेही त्यांनी सांगितले.

जावेद अख्तर – दिग्दर्शक :- माझे आणि श्याम बेनेगल यांचे जवळचे संबध होते तसेच मी स्वतःला भाग्यवान समजतो की चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधि मला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *