नववर्षात दर्शनासाठी सिद्धिविनायक न्यासाची चोख व्यवस्था
प्रभादेवी, ता. 31:- नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी यासाठी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी होती ही बाब लक्षात घेता भाविकांना दर्शन घेणे सुलभ जावे याकरिता सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी म्ह्णून लाखो भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी प्रभादेवी येथे येतात व बाप्पाचे आशीर्वाद घेतात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी न्यासाच्या वतीने उत्तम सुविधा पुरविण्यात येते.
भाविकाना दर्शनासाठी मंदिर 1 जानेवारी रोजी पहाटे 3.15 वाजता खुले होईल. पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक दिव्यांग, गरोदर स्त्रिया यांच्या करिता वेगवेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.
आशीर्वाचन रांगेसाठी सिद्धी प्रवेशद्वार, सानेगुरुजी उद्यान मंडप ते मंदिर प्रवेशद्वार तर गाभाऱ्यातून दर्शनासाठी रचना संसद कॉलेज, जय भारत हॉटेल, मंदिर प्रवेशद्वार ते गाभारा अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला व मुख दर्शनासाठी वेगळी रांग करण्यात आली आहे.
1 जानेवारी 2025 भाविकांना श्रीच्या दर्शनाच्या वेळा
पहाटे – 3.15 ते 5.15
सकाळी – 6 ते 11.50
दुपारी – 12.30 ते सायंकाळी 7.10
रात्रौ 8 ते 10.30
श्रीं ची महापूजा, नैवेद्य व आरतीच्या वेळा
पहाटे 1.30 ते 3 काकड आरती व महापूजा
पहाटे 5.30 ते 6 आरती
दुपारी 11.50 ते 12.30 श्रीं चा नैवेद्य
सायंकाळी 6.30 ते 7 पूजा धूपारती
सायंकाळी 7.30 ते 8 आरती
रात्रौ 10.30 नंतर शेजारती करून मंदिर बंद करण्यात येईल.