रजनीकांत सुहास साळवी
सोन्याची नथ आणि पैठणी जिंकण्यासाठी महिलांची स्पर्धा रंगणार
मुंबई, ता. 26 :- महिलांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनातून वेळ मिळावा त्यांची करमणूक व मनोरंजन व्हावे यासाठी चला खेळ खेळूया पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला असून या स्पर्धेत पैठणी आणि सोन्याची नथ जिंकण्याची चुरस पाहायला मिळणार आहे.
जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने दादर -माटुंगा कल्चरल सेंटर येथे शनिवार (ता. 28) रोजी महिलांसाठी चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र बाजार पेठेचे संस्थापक कौतिक दांडगे, समाजसेवक प्रशांत यादव, चित्रपट निर्माते पायल कदम, गणेश कदम, डॉ शिवाजी पाटील, सुरेंद्र गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी मारुतीरायावर चित्रित केलेले टायटल गाणे देखील मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जय हनुमान सेवा मंडळाचे कार्यवाह रजनीश कदम यांनी सांगितले.
सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आतापर्यंत भरीव कामगिरी केलेल्या जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यापुढील काळातही सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे मंडळाचे सल्लागार दिलीप कदम, विनायक कदम, मनोहर कदम आणि अमित शिंदे यांनी सांगितले.