रजनीकांत साळवी
मुंबई, ता. 2 :- कोकणातला प्रत्येक माणूस प्रेमळ आणि प्रामाणिक आहे मात्र काही दुर्गम खेडेगाव तांत्रिक आणि राजकीय दृष्ट्या उपेक्षित राहिला असल्याने त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आल्याचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त चिपळूण तालुक्यातील वारेली या खेडेगावात नवतरुण उत्कर्ष मंडळ, मधली वाडी यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यावेळेस ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, सचिन कदम, राजू भागवत, रघुनाथ सावंत, मयूर सावंत, रामचंद्र कदम, पांडुरंग कदम, नव तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष वसंत कदम, राकेश कदम, सुभाष कदम, रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याकाळी विजेचा प्रश्न गावाकऱ्यांना भेडसावणारा होता सतत जाणारी वीज यावर तोडगा काढून कायम स्वरूपी भार नियमन रद्द करण्यात यशस्वी ठरलो असल्याचे गीते यांनी सांगितले.
सिद्धी जोहरने घातलेला वेढा आणि या वेढ्यातून ठराविक मावळे सोबत घेऊन गनिमीना भूल देत महाराज कशा प्रकारे निसटले हा इतिहास अनंत गीते यांनी उलगडून सांगितला आणि इतिहासाची आठवण करून दिली.
यावेळी सेवा निवृत्त झालेल्या गावातील नागरिकांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर गेली 30 वर्षे जिल्हा परिषद शाळेत विद्या दानाचे कार्य करून अनेक विद्यार्थी घडविले त्यांना नावारूपाला आणले शाळेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले असे वारेली जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक डांगे हे निवृत्त होणार आल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला.
स्वतःच्या रक्षणार्थ बिबट्याशी दोन हात करणाऱ्या आशिष महाजन यांचा सन्मान
जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या लाडक्या श्वानांवर बिबट्या हल्ला करतोय की काय अशी चाहूल लागताच त्या क्षणी बिबट्याला बाहेर घालावीण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत असतानाच बेसावध असलेल्या महाजन यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली त्या झटपटीत बिबट्यापासून स्वतःची सुटका करण्यासाठी बचावासाठी स्व संरक्षणार्थ दोन हात करणाऱ्या महाजन यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
आधुनिक शेती करून जमिनीत विविध प्रकारची उत्तम लागवड करुंन आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे उदहारण देत महाजन यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान गावातील विविध प्रश्नांवर वारेली ग्राम विकास कमिटीचे सल्लगार सुभाष कदम यांनी समस्यांचा पाढा वाचला यावर जर मी शब्द टाकला तर तो वाया जाणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्न करिन अशी ग्वाही गीते यांनी यावेळी दिली.
