कार्यक्रत्यांसमवेत आमदारांनी साजरी केली धुलिवानंदन

Share

प्रभादेवी, ता. 15 :- एरव्ही कामाच्या व्यापात व्यस्त असले तरी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशी यांच्यात सामान्य नागरिकांप्रमाणे मिसळून आमदार महेश सावंत यांनी धुलिवंदनाचा आनंद लुटला.

प्रभादेवी येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखा क्रमांक 194 च्या वतीने आयोजित केलेल्या धुलिवंदनाच्या उत्सवात महेश सावंत यांनी हजेरी लावत धुलिवंदन साजरा केला.

यावेळी शाखा प्रमुख संजय भगत, महिला विभाग संघटक रेखा देवकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी एकच जल्लोष केला.

दादर, प्रभादेवी आणि माहीम परिसरतील नागरिकांनी तरुण पिढीनी विधानसभा निवडणुकीत महेश सावंत यांना भक्कम पाठिंबा देऊन विजयी केले होते. त्यामुळे धुलिवंदनाच्या दिवशी परिसरात ठिकठिकाणी जाऊन त्यांनी लोकांच्या गाठी भेटी घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *