यंग प्रभादेवी प्रीमियर लीग स्पर्धेत रणरागिनी संघाची बाजी
प्रभादेवी :- महिलांना त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून विरंगुळा मिळावा यासाठी आयोजित केलेल्या यंग प्रभादेवी प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेत महिलांची रणरागिणी आणि पुरुष गटात शूरवीर संघाने बाजी मारली.
यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाने प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदानात अगळ्या वेगळ्या पद्धतीने गेटटुगेदर साजरा करण्यासाठी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. यात पुरुष गटात 8 संघ तर महिलांचे 3 संघ सहभागी झाले होते.
यावेळी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार, सूर्यकांत बिर्जे, संतोष धुरी, रेखा देवकर यंग प्रभादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देसाई आदी उपस्थित होते.
विजेत्या संघाना रोख रक्कम, चषक आणि महाराष्ट्र बाजार पेठेचे संस्थापक डॉ.कौतिक दांडगे यांच्या वतीने विविध पारितोषिके देण्यात आली.
यंग प्रभादेवी क्रीडा मंडळ प्रीमियर लीग स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रेहान परब, उत्कृष्ट गोलंदाज राजेश घाग, उत्कृष्ट खेळाडू चिंतामणी म्हाडगुत, उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू ऋषीकेश कोरगावकर यांना पारितोषिक देण्यात आले.
तर महिलांमध्ये उत्कृष्ट फलंदाज जानव्ही कदम उत्कृष्ट गोलंदाज ज्योती देसाई उत्कृष्ट खेळाडू रक्षा बंडबे आणि उत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडू साक्षी घोसाळकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
क्रिकेटच्या माध्यमातून सर्वाना एकत्र आणणारा असा हा आगळा वेगळा कार्यक्रम मंडळाने राबविला तो स्तुत्य असाच आहे प्रत्येकाने असे कार्यक्रम राबविले पाहिजे जेणेकरून सर्व एकत्र येतील असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
