रजनीकांत सुहास साळवी
प्रभादेवी, ता. 31 :- मद्य प्राशन करून अनेक निष्पाप लोकांचे नाहक बळी घेणाऱ्या मद्यपी बॅडमॅनचे वरळीत गोपचार सोसायटी बाहेर मोठे कट आउट साकारले असून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री त्याचे दहन करण्यात येणार आहे.
मुंबई शहरात हिट अँड रन मुळे वाढत चाललेल्या अपघातामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत त्यामुळे यावर सरकारने कायद्यात बदल करून कठोर कायदा आणावा असा संदेश देणारी भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
वरळी येथील गोपचार सोसायटीच्या वतीने दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सामाजिक संदेश देणारे प्रतिकृती सकरण्यात येऊन त्याचे मध्यरात्री दहन करण्यात येते.
यावर्षी हिट अँड रन हा विषय घेऊन मद्यपी वाहन चालकाची प्रतिकृती सकरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली आहे या प्रतिकृतीचे दहन 31 डिसेंबरच्या मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.
या संदेशा द्वारे हिट अँड रन कायद्यात सुधारणा करून कठोर कायदा अमलात आणावा अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
