मुंबई :- पारंपरिक वर्षभरातल्या सर्व सनांचे महत्व, शिव राज्याभिषेक गाण्यातून हुबेहूब सादरीकरण करून दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील मराठी प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अमृतमहोत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला.
शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे कार्यवाह गजेंद्र शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा सर्व विभागातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मरठी प्राथमिक विभागातील चिमुकल्यानी विविध वेशभूषा उत्तम पेहराव करून संगीत, नृत्यविष्कार अशा विविध कला गुणांचे प्रदर्शन करत उपस्थिताचे मन जिंकले.
यावेळी शारदाश्रम विद्यामंदिरचे कार्यवाह गजेंद्र शेट्टी, सिने अभिनेता आकाश शिंदे, नवनीत प्रकाशनचे संचालक जे के संपत, मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर, शिक्षक राजेंद्र घाडगे, गौरी अहिरराव आदी उपस्थित होते.
शारदाश्रम विद्यामंदिरच्या वतीने रविवारी सकाळी क्षणमुखानंद सभागृहात अमृतमहोत्सवी सोहळा रंगणार असून या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन निवृत्त जनरल नितीन गडकरी, आदी उपस्थित राहणार आहेत.